गुजरातचा रणसंग्राम : विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

17 Nov 2017 05:36 PM

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केलीय. एकूण 182 जागांपैकी 70 जागांवरचे उमेदवार या पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलेत. अहमद पटेल यांच्या राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या 5 जणांचा या पहिल्या यादीत समावेश आहे.  यादीवर नजर टाकल्यास पटेल उमेदवारांची संख्याही नजरेत भरणारी आहे. पहिल्या यादीत 70 पैकी 13 उमेदवार हे पटेल आहेत. गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपाणी हे राजकोट पश्चिममधून तर उपमुख्यमंत्री नितीन पटेल मेहसाणा मधून निवडणूक लढवणार आहेत. खरंतर भाजप निवडणूक रणनीती म्हणून विद्यमान आमदारांचे तिकीट कापून नव्या चेह-यांना अधिक संधी देईल अशी चर्चा होती. मात्र पहिल्या यादीत तरी फारसा बदल दिसत नाहीय.

LATEST VIDEOS

LiveTV