गुजरातचा रणसंग्राम : जन अधिकार मंचच्या प्रवीण राम यांच्याशी खास बातचित

16 Nov 2017 10:06 PM

गुजरातमध्ये मोदींविरोधात शड्डू ठोकणारा चौथा चेहरा म्हणजे प्रवीण राम.. जन अधिकार मंचाच्या माध्यमातून 27 वर्षाच्या प्रवीण रामनं गुजरातमधील आशा वर्कर आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा लढा उभा केलाय.
गुजरातमध्ये जन अधिकार मंचाचे तब्बल 30 लाख सदस्य आहेत. त्यामुळे प्रवीण रामच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रवीणला आपल्या बाजूनं ओढण्यासाठी काँग्रेसचेही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. काँग्रेसचे गुजरात प्रभारी अशोक गेहलोत यांनीही त्याच्याशी बातचित केलीय.
यानंतर प्रवीण रामचं काय म्हणणं आहे.. भाजपच्या धोरणांबद्दल आणि काँग्रेसच्या आश्वासनांबद्दल त्याला काय वाटतंय पाहूयात...

LATEST VIDEOS

LiveTV