गुजरातचा रणसंग्राम : भाजप पाच हजार EVM हॅक करणार : हार्दिक पटेल

17 Dec 2017 08:57 PM

गुजरात विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल येण्यास अवघे काही तास बाकी असताना पाटीदार नेता हार्दिक पटेलनं भाजपवर खळबळजनक आरोप केले आहेत. भाजपनं ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी एका कंपनीला कंत्राट दिल्याचा धक्कादायक आरोप हार्दिकने केला आहे. गुजरातमधले 5 हजार ईव्हीएम मशीन हॅक करण्यासाठी भाजपनं तब्बल 140 अभियंत्यांना कामाला लावल्याचा दावाही हार्दिकनं केला आहे. जर इव्हिएम मशीनमध्ये गडबड झाली नाही तर भाजपला गुजरातमध्ये फक्त 82 जागाच राखता येतील असा दावा हार्दीकनं आपल्या ट्विटमधून केला.

LATEST VIDEOS

LiveTV