गुजरात निकाल : सुरतमध्ये मराठमोळ्या संगीता पाटील यांची बाजी

19 Dec 2017 05:45 PM

गुजरातमधील विधानसभा निवडणुकांमध्ये लिंबायत मतदारसंघातून मराठमोळ्या महिलेने विजय मिळवला आहे. भाजपच्या उमेदवार संगीता राजेंद्रभाई पाटील यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाची धूळ चारली. काँग्रेसच्या रविंद्र सुकलाल पाटील यांचा संगीता पाटील यांनी तब्बल 31 हजार 951 मतांनी पराभव केला. संगीता पाटील सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्या आहेत.
संगीता पाटील या धुळ्यातील शिरपूर तालुक्यातल्या अर्थे गावातल्या माहिरवाशीण आहेत. खानदेशकन्येने मिळवलेल्या घवघवीत यशामुळे महाराष्ट्राची मानही अभिमानाने उंचावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

LATEST VIDEOS

LiveTV