गुजरात : हार्दिक पटेलचा व्हिडिओ व्हायरल, घाणेरडं राजकारण असल्याची हार्दिकची प्रतिक्रिया

13 Nov 2017 10:00 PM

गुजरातमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना, एका व्हिडीओने मात्र खळबळ उडवून दिली आहे... हा व्हिडीओ हार्दिक पटेलचा असल्याचा प्रचार सध्या व्हॉट्सॅपवरून सुरु झाला आहे. अर्थात व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती हार्दिकच आहे का? याची पुष्टी मात्र आम्ही करत नाही...
पण हार्दिकचे विरोधक मात्र या व्हिडीओला प्रचंड व्हायरल करत आहेत... दुसरीकडे हार्दिकने मात्र हे घाणेरडं राजकारण असल्याचा दावा केला आहे...
दरम्यान या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती ही हार्दिक पटेलच आहे की नाही, याची पुष्टी मात्र झालेली नाही... शिवाय हा व्हिडीओ कुणी शूट केला, कोणत्या ठिकाणी केला...आणि का शूट करण्यात आलेला... याचीही माहिती मिळू शकलेली नाही...
दरम्यान याआधीही पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा राहुल गांधींना भेटल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता...तेव्हा आम्ही हार्दिक पटेलचा घेतलेल्या मुलाखतीत  हे भाजपचं खालच्या पातळीचं राजकारण असल्याचा आरोप हार्दिक पटेलनं केला होता...पाहूयात

LATEST VIDEOS

LiveTV