गुजरात विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्याच्या प्रचारतोफा थंडावल्या

07 Dec 2017 11:54 PM

गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचारतोफा थंडावल्यात. पंतप्रधान मोदींसह, राहुल गांधी, अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेते आज गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत.
सलग 22 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजप आणि पंतप्रधान मोदींसाठी गुजरातची निवडणूक प्रतिष्ठेची आहे. तर लवकरच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या राहुल गांधींसाठीही गुजरातची लढाई ही निकराची ठरणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV