गुजरातचा रणसंग्राम : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

29 Nov 2017 10:12 PM

अवघ्या देशाचं लक्षं लागलेलं गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या चारही प्रचार सभेतून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. मोरबीतील सभेत मोदींनी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींचा एक संदर्भ देत टीका केली. गुजरातमधील रस्त्यांवरुन फिरताना नाकावर रुमाल ठेवायच्या. त्यांना येथील रस्त्यांवरुन फिरताना दुर्गंधी यायची. मात्र पण जनसंघ आणि आरएसएससाठी मोरबीचे रस्ते सुगंधी होते, कारण तो सुगंध मानवतेचा होता असं मोदी यावेळी म्हणाले. 18 टक्क्यांपेक्षा अधिक जीएसटी आकारण्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य करणाऱ्या राहुल गांधींना नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेसचा जीएसटी म्हणजे ‘ग्रँड स्टुपिड थॉट’ अशा शब्दात मोदींनी खिल्ली उडवली. मोदींच्या मोरबी, गीर सोमनाथ, भावनगर आणि नवसारी या चार ठिकाणी सभा घेतल्या. 

LATEST VIDEOS

LiveTV