अहमदाबाद : गुजरात सर्व्हे : हार्दिक पटेल काँग्रेससोबत, तरीही भाजप नंबर वन

25 Oct 2017 10:03 AM

सत्ताधारी भाजपाविरुद्ध वारे वाहत असल्याने गुजरातच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र आज तक, इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाच्या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपचंच सरकारच सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पोलमध्ये 182 सदस्य असलेल्या गुजरातच्या विधानसभेमध्ये भाजपला 115 ते 125 जागा तर काँग्रेसला केवळ 57 ते 65 जागा मिळतील, असं या सर्वेत नमूद करण्यात आलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV