गुजरातसाठी रो-रो सेवा, निवडणुकीच्या तोंडावर मोदींचं बंपर गिफ्ट

22 Oct 2017 08:54 PM

पंतप्रधान मोदी आज सकाळी गुजरातमधील भावनगरच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या एका महिन्यातला मोदींचा हा तिसरा गुजरात दौरा आहे. यावेळी मोदींनी रो- रो फेरी सर्विस या प्रोजेक्टचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसला टोमणा लगावला... ते म्हणाले की ज्यावेळी मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्य़ा काँग्रेसने मला बऱ्याचदा आडकाठी केली... आणि राज्याच्या विकासाला टाळं ठोकलं,...
सोबतच उद्योगांना पर्यावरणाचं नाव देत रोखलं... त्यामुळे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळी मला किती संघर्ष करावा लागला हे मीच जाणतो... असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काढले.

LATEST VIDEOS

LiveTV