अहमदाबाद : नरेंद्र मोदी रोज चार लाखांचे मशरुम खाल्ल्यामुळे गोरे : अल्पेश ठाकोर

13 Dec 2017 08:57 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रंग सावळा होता, मात्र दररोज चार लाख रुपयांचे पाच मशरुम खाल्ल्यामुळे त्यांचा रंग उजळला, असा दावा गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची तारीख अद्याप समजलेली नाही.

मोदी तैवानहून आयात केलेले पाच मशरुम रोज खातात. एका मशरुमची किंमत 80 हजार रुपये आहे. म्हणजेच मोदी रोज चार लाख रुपयांचे मशरुम खातात. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांना ही सवय असल्यामुळे ते गोरे आणि तंदुरुस्त झाले, असा दावाही अल्पेश ठाकोर यांनी केला.

LATEST VIDEOS

LiveTV