हार्दिक पटेलचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

14 Nov 2017 03:18 PM

गुजरातमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना हार्दिक पटेलचा आणखी एका व्हिडीओ समोर आला. यात हार्दिक पटेल स्पष्टपणे दिसत आहे. न्याययात्रेच्या दुसऱ्या दिवशी हार्दिक आणि त्याच्या मित्र-मैत्रिणींनी मद्यप्राशन केल्याचा त्यात आरोप आहे. 21 मे रोजी मोदींच्या दौऱ्याआधी हार्दिक पटेलसह 50 जणांनी मुंडन केलं होतं. त्यावेळचा हा व्हिडीओ असल्याचं बोललं जातं. हार्दिकची कथित सीडी रिलीज करणाऱ्या अश्विन सांकडसरिया यांचा हात आहे. आणि त्यांचे भाजप नेत्यांसोबतचा फोटो समोर आलाय, त्यामुळे या व्हिडीओमागे भाजपचा हात आहे का हा प्रश्न पडलाय. एबीपी माझानं या व्हीडओची पडताळणी केली नाही.

LATEST VIDEOS

LiveTV