मॉस्को : रशियात बर्फवृष्टीमुळे 1200 गाड्यांचा अपघात, बर्फ हटवण्याचं काम सुरु

23 Nov 2017 02:15 PM

रशियातल्या व्लादिवोस्तोक शहरात बर्फवृष्टीमुळे बाराशे गाड्यांचा अपघात झाला. बर्फवृष्टीमुळे व्लादिवोस्तोक शहरातल्या रस्त्यांवर बर्फाची चादर पाहायला मिळाली पण दुसरीकडे शहरातील रस्ते घसरणीचे झाल्यामुळे जवळपास 1200 गाड्यां एकमेकांना धडकल्या. आणि त्यात अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे रशियातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. शाळांना सुट्टी देण्यात आलीय तर शहरातील रस्त्यांवर ट्रॅफिक झाल्याचं चित्र आहे. प्रशासनाकडून बर्फ हटवण्याचं काम युद्धुपातळीवर सुरु आहे.

LiveTV