शिमला : हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांची वर्णी

24 Dec 2017 04:03 PM

हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांची वर्णी लागणार आहे. आमदारांच्या बैठकीत आज हा निर्णय झाला आहे. याची औपचारिक घोषणा करण्यात आज बैठकीनंतर आली आहे.

आज मुख्यमंत्रीपदासाठी हिमाचल प्रदेशमध्ये आमदारांची बैठक झाली. या बैठकीला कोअर कमिटीचे सदस्यही उपस्थित होते. तसंच भाजपचे खासदारही उपस्थित होते. या बैठकीवेळी जयराम ठाकूर यांचं नाव सुचवण्यात आलं आणि त्यावरच सर्वांचं एकमत झालं.

जयराम ठाकूर हे याआधी चारवेळा विधानसभेत निवडून आले आहेत. सलग पाचव्यांदा विधानसभा जिंकत मुख्यमंत्रीपदी जयराम ठाकूर यांनी नाव कोरलं आहे. हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत प्रेमकुमार धुमल यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भाजपनं घोषित केलं होतं, मात्र धुमल निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV