हिंगोली : औंढा नागनाथच्या ज्योतिर्लिंगाला गटारगंगेचा वेढा!

11 Oct 2017 09:36 PM

12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या हिंगोलीतल्या औँढा नागनाथच्या मंदिराला चक्क गटारीच्या पाण्याचा वेढा पडला. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून परतीच्या पावसानं राज्यात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातलाय. हिंगोलीतही तुफान पाऊस झाला. मात्र औंढानागनाथ नगरपंचायतीनं नालेसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानं शंकराच्या डोक्यातून गंगा वाहण्याऐवजी गटारगंगा वाहू लागल्याचा आरोप होतो आहे. यामुळे मंदिर परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याचंही भाविक सांगत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV