हिंगोली : राजीव सातव यांच्या मारहाणीचे हिंगोलीत पडसाद, संतप्त कार्यकर्त्यांची बसवर दगडफेक

03 Dec 2017 07:18 PM

गुजरात निवडणुकीत झालेल्या वादाचा परिणाम राज्यातही पाहायला मिळत आहे. राजकोटमध्ये खासदार राजीव सातव यांना झालेल्या मारहाणीविरोधात काँग्रेस कार्यकर्ते हिंगोलीत आक्रमक झाले आहेत. औंढा-नागनाथ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका बसची तोडफोड केली. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळत भाजपच्या कार्यालयाचीही तोडफोड केली.

हिंगोली हा खासदार राजीव सातव यांचा मतदार संघ आहे. गुजरातमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या भावाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या घराबाहेर काँग्रेसने निदर्शनं केली. निदर्शनं करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये खासदार राजीव सातव यांचाही समावेश होता.

LATEST VIDEOS

LiveTV