हिंगोलीच्या डीवायएसपींनी अनिकेत कोथळेच्या मुलीचं पालकत्व स्वीकारलं

11 Dec 2017 10:15 PM

पोलिस म्हटलं की मनात आपोआप एक प्रकारचा धाक निर्माण होता. सांगलीतल्या अनिकेत कोथळे प्रकरणात पोलिसांचं भयानक रुप समोर आल्यानंतर तर ही भीतीच आणखीच जास्त निर्माण झाली आहे. परंतु आता अनिकेत कोथळे प्रकरणातच पोलिसांचं भावनिक, सामाजिक रुप समोर आलं आहे.

अनिकेत कोथळेच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावरचं छत्र हरवलं आहे. पत्नी आणि तीन वर्षाची प्रांजल आता आधारहीन झाल्या आहेत. या प्रकरणात एक सामाजिक बांधिलकी जोपासत, हिंगोलीत कार्यरत असलेल्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी प्रांजलचं पालकत्व स्वीकारलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV