राज्यात थंडीचा कडाका वाढला, गरम पाण्यात बसून आंघोळीचा मुलाचा व्हिडिओ व्हायरल

13 Nov 2017 11:54 PM


एक हटके बातमी... थंडीची चाहूल लागलीय... थंडीच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी कोणी गरम कपडे वापरतं, कुणी शेकोटीचा आसरा घेतं.. मात्र एका मुलानं थंडीपासून वाचण्यासाठी शोधलेली शक्कल पाहून तुम्हीही चक्रावून जाल... हा पठ्ठा पेटत्या चुलीवर ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात बसून आंघोळ करतोय.. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे.. दरम्यान ही शक्कल या मुलाच्या डोक्यात कुठून आली.. तसंच पेटत्या चुलीवरच्या भांड्यात त्याला चटके बसत नाही का असे अनेक प्रश्न हा व्हिडीओ पाहिल्यानंतर उपस्थित होणं साहजिक आहे.. दरम्यान प्रेक्षकांना एक विनंती आहे.. कुणीही असा प्रयोग घरी करू नये..

LATEST VIDEOS

LiveTV