अमेरिका : 3 वर्षीय अनाथ भारतीय मुलीची पित्याकडून हत्या

28 Oct 2017 10:57 AM

तीन वर्षीय अनाथ भारतीय मुलीला दत्तक घेतलेल्या शिरीन मॅथ्यूजची अमेरिकेत पालक पित्याकडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत असून, सखोल चौकशी करण्याचे आदेश परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी महिला आणि बालविकास मंत्रालयाला दिले आहेत.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, आता यापुढे परदेशातील नागरिकांनी भारतातून दत्तक घेतलेल्या मुलांचे पासपोर्ट हे महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या मंजुरीनंतरच दिले जातील, असंही परराष्ट्र मंत्रालयानं शुक्रवारी स्पष्ट केलं.

LATEST VIDEOS

LiveTV