हैदराबाद : असदुद्दीन ओवेसींचं आणखी एक चिथावणीखोर वक्तव्य

24 Dec 2017 12:12 AM

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. ‘जेव्हा आम्ही हिरवा रंग परिधान करु तेव्हा सर्व ठिकाणी हिरवाच रंग दिसेल. आमच्या हिरव्या रंगासमोर कुठलाही रंग टिकणार नाही. आमच्या रंगासमोर ना मोदींचा रंग, ना काँग्रेसचा रंग… कोणताचा रंग टिकणार नाही. फक्त हिरवा रंग पाहाल.’ असं असदुद्दीन ओवेसी म्हणाले. हैदराबादमध्ये शुक्रवारी रात्री एका जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी हे चिथावणीखोर वक्तव्य केलं.

LATEST VIDEOS

LiveTV