स्पेशल रिपोर्ट : इंदापूर (पुणे) : ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचं विदारक वास्तव

24 Nov 2017 12:45 PM

उसतोडणी कामगारांच्या मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.. 

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील 12 - 14 लाख उस तोडणी मजूर महराष्ट्रासह इतर राज्यात उस तोडणी साठी स्थलांतरित होत असतात. या कुटुंबासोबत त्यांची मुले ही मोठ्याप्रमाणावर स्थलांतरित होत असतात. मराठवाड्यात मूळ शाळेत या मुलांना शिक्षण मिळत होतं. पण ऑक्टोबर ते एप्रिल या सहा महिन्याच्या साखर हंगामात ही मुले आई वडिलांबरोबर जातात आणि मग शालाबाह्य होतात. या मुलांना शाळेत आणण्याचे किंवा यांना शिक्षण देण्याचे कोणतीही ठोस  योजना सध्या नाही. इंदापूर तालुक्यात चार साखर कारखाने आहेत या कारखान्याच्या उसाच्या तोडणीसाठी हजारो ऊसतोडणी मजूर आहेत. पण त्यांच्याबरोबरआलेले मुले ही शिक्षणापासून वंचित झालेली दिसून येत आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV