कोल्हापूरची अनुजा पाटील टीम इंडियाची कर्णधार

23 Nov 2017 01:09 PM

बांगलादेश ‘अ’ संघाबरोबर भारतात होणाऱ्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी भारतीय ‘अ’ संघाची धुरा मराठमोळ्या अनुजा पाटीलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. अनुजा पाटील ही मूळची कोल्हापूरची आहे.

येत्या डिसेंबर महिन्यात कर्नाटक येथे बांग्लादेशच्या ‘अ’ महिला क्रिकेट संघासोबत भारतीय महिलांची ‘अ’ टीम भिडणार आहे. या मालिकेत 2 डिसेंबरपासून तीन एकदिवसीय सामने हुबळी येथे खेळले जाणार आहे. तर 12 डिसेंबरपासून तीन टी 20 सामने बेळगावात होणार आहेत.

त्याआधी बांगलादेशचा संघ 26 आणि 28 नोव्हेंबरला अलुरमध्ये दोन सराव सामनेही खेळणार आहे.

LATEST VIDEOS

LiveTV