मोबाईल डेटा वापरात भारत जगात अव्वल, महिन्याला दीडशे कोटी जीबींचा वापर

27 Dec 2017 12:00 PM

जगात भारत हा सर्वाधिक डेटा वापरणारा देश ठरला आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष अमिताभ कांत यांनी यासंदर्भातली माहिती दिली. भारतीय दर महिन्याला 150 कोटी गीगाबाईटस् मोबाईल डेटा वापरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मोबाईल डेटा वापराच्या बाबतीत आपण अमेरिका आणि चीनलासुद्धा मागे सोडलं आहे, असं अमिताभ कांत म्हणाले. अमेरिका आणि चीनच्या दरमहिन्याच्या डेटाला एकत्रित केल्यानंतरसुद्धा भारताचा मोबाईलचा डेटा वापर जास्त आहे. ही माहिती जाहीर करताना अमिताभ कांत यांनी या माहितीचा स्रोत मात्र सांगितलेला नाही.

LATEST VIDEOS

LiveTV