नवी दिल्ली : पाक मीडियाने लायकी दाखवली, कुलभूषण जाधवांच्या कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न

27 Dec 2017 01:06 PM

कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीदरम्यान पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी माध्यमांनी लायकी दाखवून दिली.

भेटीनंतर पाकिस्तानी माध्यमांनी कुलभूषण यांच्या आई आणि पत्नीला अपमानास्पद प्रश्न विचारले.

आपके पतीने हजारो बेगुनाह पाकिस्तानीयों के खून से होली खेली, इसपर आप क्या कहेंगी?  अपने कातील बेटे से मिलने के बाद आपके क्या जजबात हैं?

अशा प्रकारचे प्रश्न पाकिस्तानी माध्यमांच्या प्रतिनिधींनी कुलभूषण यांच्या कुटुंबियांना विचारले.

कुलभूषण जाधव हे भारतीय नागरिक असून, भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आहेत. हेरगिरीच्या आरोपाखाली कुलभूषण सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV