वाशिंबे-जेऊरदरम्यान ट्रॅकची दुरुस्ती, पुणे-सोलापूर इंटरसिटी पुढील 4 महिन्यांसाठी बंद

28 Oct 2017 11:39 AM

वाशिंबे-जेऊरदरम्यान सिंगल लाईनवरील ट्रॅकच्या कामामुळे सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस पुढचे 4 महिने बंद राहणार आहे. सोबतच साईनगर-पंढरपूर ही आठवड्यातून तीन दिवस धावणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.
दरम्यान या मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या कुर्डुवाडी आणि भिगवणपर्यंत धावणार आहेत. वाशिंबे-जेऊर ट्रॅकवर 1 नोव्हेंबरपासून रोज पावणेदोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.
दरम्यान दोन गाड्या अचानकपणे बंद करणाऱ्या रेल्वे प्रशासनानं लोकांच्या सोईसाठी पर्यायी उपाय शोधावा अशी मागणी रेल्वे प्रवाशी संघानं केली.

LATEST VIDEOS

LiveTV