इस्लामाबाद/ पाकिस्तान : कुलभूषण जाधव आणि कुटुंबियांच्या भेटीत पाकचा नालायकपणा

26 Dec 2017 06:51 PM

पाकिस्ताननं  पुन्हा एकदा आपली औकाद दाखवून दिली. कुलभूषण आणि कुटुंबीयांच्या भेटीवेळी  भारतीय अस्मितेला धक्का लावण्याची नापाक हरकत घडली. कुलभूषण यांच्या आईला चक्क मराठीत बोलण्यास मज्जाव करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांना बांगड्या, टिकली, मंगळसूत्र इतकंच काय भारतीय पेहरावही बदलण्यास पाकिस्तान सरकारनं भाग पाडल्याचं धक्कादायक बाब समोर आली. विशेष म्हणजे, कुलभूषण यांच्या पत्नीला भेटीवेळी उतरवण्यास भाग पाडलेले शूजही पुन्हा देण्यात आले नाहीत. पाकिस्तानानं आपल्या सर्व मर्यादा पार केल्यानंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होतो आहे.

LATEST VIDEOS

LiveTV