निवडणूक स्वत: च्या ताकदीवर जिंका : पाकिस्तान

11 Dec 2017 02:24 PM

निवडणूक जिंकायची असेल तर स्वत:च्या ताकदीवर जिंका. गुजरात निवडणुकीत पाकिस्तानला विनाकारण खेचू नका. असं वक्तव्य पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे. आपण पंतप्रधान झाल्यानंतर काँग्रेसचे मणिशंकर अय्यर पाकिस्तानात गेले होते. तिथं त्यांनी भारत पाक संबंध सुधारायचे असतील, तर नरेंद्र मोदींना रस्त्यावरुन हटविण्याची भाषा केली होती, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील एका सभेत केला होता. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाकडून मात्र हे आरोप फेटाळण्यात आलेत. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदी यांचा नीच माणूस असा उल्लेख केल्यानंतर, मोदींनी अय्यर यांच्यावरील हल्ला अधिक तीव्र केला.

LATEST VIDEOS

LiveTV