जयपूर: पद्मावती वाद : 'हम पुतले जलाते नहीं, लटकाते है'

24 Nov 2017 03:54 PM

पद्मावती सिनेमाचा विरोध दिवसेंदिवस भीषण रुप धारण करतोय की काय असा प्रश्न पडू लागला आहे. कारण आतापर्यंत तोडफोड करुन निषेध करणाऱ्या लोकांकडून चक्क हत्या केल्याचा दावा केला जातोय.
जयपूरजवळच्या नाहरगड किल्ल्यावर एका तरुणाचा लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही हत्या होती आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी या गडावरच्या पायथ्याशी असणाऱ्या दगडांवर अनेक धमक्यांचे निनावी संदेश लिहिण्यात आले आहेत.
ज्यात हम पुतले नही जलाते, लटकाते है... असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

LiveTV