जळगाव : माझ्या मनातलं अजितदादांच्या कानात सांगितलं, एकनाथ खडसेंची कोपरखळी

29 Dec 2017 12:00 AM

माझ्या मनात जे आहे ते अजितदादांच्या कानात सांगितलं अशी कोपरखळी भाजप नेते एकनाथ खडसेंनी मारली. जळगावातील राष्ट्रवादी आमदार सतीश पाटलांच्या 60 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे अजित पवार आणि एकनाथ खडसे एकाच मंचावर आल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं. खडसेंना राष्ट्रवादीतून आमंत्रण असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्यावर बोलताना खडसेंनी हे वक्तव्य केलं.

LATEST VIDEOS

LiveTV