जळगाव : बिबट्याच्या शिकारीसाठी गिरीश महाजनांच्या हातात बंदूक!

27 Nov 2017 09:06 PM

जळगावातल्या चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबिट्याची शिकार करण्यासाठी गिऱीश महाजन स्वतः हातात बंदूक घेऊन शिवारात उतरले. चाळीसगावातल्या वरखेडे आणि लोंढे शिवारात नरभक्षक बिबिट्याचा वावर आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने पशू, पक्षी यांच्यासह महिला, मुले यांचे बळी घेतले असून त्याच्या शिकारीचे आदेश सरकारनं दिले. मात्र बिबट्याच्या शिकारीची जबाबदारी वन कर्मचाऱ्यांची असताना गिरीश महाजन बिबिट्याच्या शिकारीसाठी का पुढे सरसावले असा सवाल विचारला जातो. तसंच सुरक्षेची कोणतीही तजवीज नसताना गिरीश महाजनांनी हे धाडस दाखवण्याची काय गरज होती असाही प्रश्न विचारला जातो आहे.  

LATEST VIDEOS

LiveTV