जळगाव : सत्तेत नसल्याने फोटोंसाठी सुप्रिया सुळेंकडे खूप वेळ : चंद्रकांतदादा पाटील

09 Nov 2017 08:27 PM

राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंच्या रस्त्यावरील खड्ड्यांविरोधातील राबवलेल्या 'सेल्फी विथ खड्डे' अभियानावर जहरी टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या सत्तेत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे असे फोटो काढण्यासाठी भरपूर वेळ आहे. त्यांच्या सरकारच्या काळात रस्तेकामांसाठी इतकंच बजेट दिलं जायचं, की त्यातून नवीन रस्ते काय, तर आहे त्या रस्त्यांवरील खड्डे बुजवणंही कठीण असायचं, असं पाटील म्हणाले. त्यामुळे रस्तेकामांसाठीचं बजेट त्यांच्या सरकारनं 15 वर्षांच्या काळात का वाढवलं नाही, हे सुप्रिया सुळे यांनी आपल्या वडिलांना आणि भावाला विचारावं, असा घणाघातही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV