जळगाव : वाढतं प्रदूषण माशांच्या जीवावर, मेहरुण तलावात मृत माशांचा खच

13 Oct 2017 08:57 PM

जळगाव शहराचं प्रमुख आकर्षण असलेल्या मेहरुण तलावात सध्या मृत माशांचा खच पडला आहे. मेहरुण तलावाचं नुकतंच सुशोभीकरण करण्यात आलं. तलावाच्या मूळ रचनेत बदल झाल्यानं आधी पक्षांनी पाठ फिरवली आणि आता मृत माशांचा खच पडला. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण आहे. वातावरणातील बदल किंवा तलाव परिसरातील वाढते प्रदूषण याला कारणीभूत असल्याचा अंदाज पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केलाय.

LATEST VIDEOS

LiveTV