जळगाव : कचऱ्याला कंटाळून ना धों महानोरांनी घर सोडलं, राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया

13 Oct 2017 08:15 PM

ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांची व्यथा एबीपी माझानं महाराष्ट्रासमोर मांडल्यानंतर अखेर लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे आमदार सुरेश भोळे, खासदार ए. टी. नाना पाटील यांनी माझाच्या प्रतिनिधींची भेट घेऊन या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली. शिवाय महानोर यांना घरी परत येण्यासाठी मन वळविण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही सांगितलं. इतकंच नाही, तर महापालिका प्रशासनाला जाब विचारुन, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचं आश्वासन या तिन्ही लोकप्रतिनिधींनी दिलं आहे.

LATEST VIDEOS

LiveTV