जळगाव : शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वर्षभराचा मोफत पास, नशिराबाद ग्रामपंचायतीचा उपक्रम

05 Nov 2017 09:00 PM

गावातल्या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी जळगावमधल्या नशिराबादच्या ग्रामपंचायतीनं तब्बल 850 विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी मोफत बस पासचं वितरण केलं.
कधी दुष्काळ, कधी गारपीट, तर कधी अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यानं शेतकऱ्याचं अर्थचक्र बिघडतं, त्याचा थेट परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर होतो आणि हीच अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतीनं 14 व्या वित्त आयोगातून 12 लाख रुपयांची तरतूद केली.
त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभराचा प्रवास मोफत करुन देणारी नशिराबादची ग्रामपंचायत बहुदा राज्यातली पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV