जळगाव : कचऱ्याच्या ढिगाऱ्याला कंटाळून महानोरांनी राहतं घर सोडलं!

12 Oct 2017 09:21 PM

ज्या माणसानं महाराष्ट्राला अजरामर कविता दिल्या. ज्या माणसानं माणसाला निसर्गावर प्रेम करायला शिकवलं. त्याच माणसाला आज आपलं घर सोडावं लागलं. घरासमोरच्या रिकाम्या भूखंडावरचा कचरा न हटवल्यानं उद्विग्न झालेल्या रानकवी आणि पद्मश्री ना. धों. महानोर यांनी जळगावमधल्या आपल्या राहत्या घराला टाळं लावून, भाड्याच्या खोलीमध्ये आसरा घेतला आहे.

LATEST VIDEOS

LiveTV