जळगाव : शिक्षकाचा चौथीतील विद्यार्थिनीवर धाक दाखवून बलात्कार

21 Nov 2017 11:48 AM


जळगावच्या भुसावळ तालुक्यात मुख्याध्यापकाने शाळेतील मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलीय. गणेश कोलते असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे. सध्या तो बोहार्डी गावात जिल्हापरिषदेच्या शाळेत कार्यरत आहे. चौथीत शिकणाऱ्या मुलीवर धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप मुलीच्या आईनं केला आहे.. संबंधीत प्रकरण मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात बलात्काराच्या गुन्हाच्या नोंद करण्यात आलीय.

LATEST VIDEOS

LiveTV