जळगाव : दारुचा ट्रक अंगावर पडल्यानं एकाचा मृत्यू, लोकांचा मात्र दारुवर डल्ला

04 Nov 2017 08:54 PM

मद्याच्या बाटल्यांनी भरलेल्या एका ट्रकचा जळगाव जिल्ह्यातील पाडळसा गावात अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटलेला हा ट्रक पलटी होवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर पडला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झालेत. यावेळी जमलेल्या लोकांनी अपघातग्रस्तांना ट्रक खालून काढण्यासाठी प्रयत्न सुरुही केला. मात्र पलटी झालेल्या ट्रकमध्ये विदेश मद्य असल्याचं लक्षात येतोच जमलेल्यांनी मदतकार्य थांबवलं आणि आपला मोर्चा मद्याच्या बाटल्यांकडे वळविला. एकीकडं अपघातातील जखमी विव्हळत होते तर दुसरीकडे जमलेले लोकं दारु घेऊन जाण्यात व्यस्त होते.
घटनास्थळावर पोलीस येईपर्यंत जमलेल्या लोकांनी ट्रकमधील अर्धा माल लंपास केला. हे चित्र बघून समाजातील माणूसकी मरत चालल्याचा प्रत्यय आला.

LATEST VIDEOS

LiveTV