जळगाव : तपासलेल्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांच्या हाती, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा निर्णय

28 Nov 2017 07:33 PM

परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाल्याच्या अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतात. या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आता तपासलेले पेपरच विद्यार्थ्यांच्या हाती देण्याचा निर्णय घेतलाय. विद्यापीठ स्तरावर हा पहिलाच प्रयोग आहे. विद्यापीठ आणि परीक्षा विभागाची पारदर्शकता वाढविणाऱ्या या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलंय. कुलगुरु डॉ. पी.पी. पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा पेपर पुनर्तपासणीसाठी लागणारा वेळ आणि पैसाही वाचणार आहे. राज्यभरात प्रथमच राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे शिक्षण आणि परिक्षापद्धतीमधील पारदर्शकता वाढीस लागणार असल्याचं मत कुलगुरुंनी व्यक्त केलं. 

LATEST VIDEOS

LiveTV