जम्मू-काश्मीर : शोपियानजवळ जवानांसोबतच्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

19 Dec 2017 12:57 PM

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. शोपीयानमधील बटमोरनगावात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्कराने परिसरात नाकाबंदी करत तपास सुरु केला. एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा गोळीबार करायला सुरुवात केली. दहशवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून, सुरक्षादलाकडून शोधमोहीम अजून सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

LATEST VIDEOS

LiveTV