झारखंड : आमदारांकडून चुंबन स्पर्धेचं आयोजन, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वाद

13 Dec 2017 10:27 AM

झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 400 किमी अंतरावर असलेल्या संथाल परगनातील झुमरिया गावात जत्रेदरम्यान काल रात्री आयोजित केलेल्या चुंबन स्पर्धेचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये अनेक आदिवासी दाम्पत्य चुंबन घेत असल्याचं दिसत असून तिथे उपस्थित लोक टाळ्या वाजवताना दिसत आहेत. पारंपरिक ग्रामीण जत्रेदरम्यान आदिवासी दाम्पत्यासाठी चुंबन प्रतिक्रिया आयोजित केल्याने झारखंड मुक्ती मोर्चाच्या दोन आमदार अडचणीत आले आहेत. सत्ताधारी भाजपने दोन्ही आमदारांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV