कल्याण : नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येसाठी 1 कोटीची सुपारी?

20 Dec 2017 08:51 AM

कुणाल पाटील हे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भाजपा पुरस्कृत नगरसेवक असून आगामी काळात आमदारकीचेही ते दावेदार मानले जातात. मात्र त्यांना मारण्यासाठी आपल्याला एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असून त्यापैकी ११ लाख रुपये ऍडव्हान्सही घेतल्याची कबुली आरोपीने दिलीये. डोंबिवलीतल्या भाजपाच्याच एका बाहुबली नगरसेवकाने आपल्याला ही सुपारी दिल्याचं त्याने आपल्या जबाबात म्हटलंय. त्यामुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडालीये. या आरोपीसह एकूण ६ जणांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने भिवंडी-वाडा रोडवरील सशस्त्र दरोडा प्रकरणात अटक केलीये.

LATEST VIDEOS

LiveTV