कल्याणमध्ये दारुचा गोलमाल उघड, 14 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोघे अटकेत

04 Nov 2017 11:09 PM

दारुचा गोलमाल करणाऱ्या दोघांच्या कल्याण गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. रंजन शेट्टी आणि हिरामण म्हात्रे आरोपींची नावे असून त्यांच्याकडून साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
डोंबिवली शिळफाटा रोडवर त्यांचा धंदा सुरु होता. गोव्यात 80 ते 90 रुपयांना मिळणाऱ्या हलक्या प्रतीची दारु उंची मद्याच्या बाटलीत भरून ते विकत होते. यासाठी ते भंगारवाल्यांकडून उंची मद्याच्या बाटल्या विकत घेत होते. एका कंटेनरमध्ये ते हा गोरखधंदा करत होते. विशेष म्हणजे ही दारु बाजारभावाच्या निम्म्या किंमतीत विकत असल्यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात दारु विकत घेत होते. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत दारुचे 380 बॉक्स, बाटल्यांची 8 हजार नवीन झाकणे जप्त करण्यात आली आहेत.

LATEST VIDEOS

LiveTV