कल्याण : पासपोर्ट व्हेरीफिकेशनवेळी हाफपँट घातल्यानं पोलिसांनी तरुणाला हाकललं

09 Nov 2017 12:33 PM

पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी हाफ पॅन्ट घालून गेल्यानं पोलिसांनी तरुणाला धक्के मारत हाकलून दिल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला. हा सगळा प्रकार या तरुणानं मोबाईलमध्ये चित्रित केला. मंगेश देसले असं या तरुणाचं नाव असून तो इंजिनियर आहे. सध्या एमपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या मंगेशनं पासपोर्टसाठी अर्ज केला होता. यात पोलिस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तो 3 नोव्हेंबर रोजी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र तिथे  हाफ पँट घातली या कारणावरून पोलिसांनी त्याला हटकलं. या तरुणानं असा काही नियम आहे का.. अशी विचारणा करताच पोलिसांनी मंगेशला अक्षरशः धक्के मारत पोलिस ठाण्याच्या बाहेर काढलं.

LATEST VIDEOS

LiveTV