कल्याण : उल्हासनगर मनपा आयुक्तांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, कल्याण कोर्टाचे आदेश

15 Nov 2017 09:42 AM

उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पोलीस उपायुक्त अंकित गोयल आणि पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्याविरोधात ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा, असे आदेश कल्याण न्यायालयानं दिलेत. जुलै महिन्यात उल्हासनगर महापालिकेत गटनेत्यांच्या केबिन वाटपावरून आयुक्त आणि रिपाई नगरसेवकांमध्ये वादावादी झाली होती. यावेळी पालिका आयुक्त निंबाळकरांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळं रिपाईचे नगरसेवक भगवान भालेराव यांनी कल्याण न्यायालयात धाव घेतली. भालेरावांच्या तक्राराची दखल घेत कल्याण न्यायालयानं पालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि पोलीस निरीक्षकांविरोधात गुन्हा दाखल कऱण्याचे आदेश दिलेत.

LATEST VIDEOS

LiveTV