मुुंबई : प्रदीप शर्मांवर खंडणीचा आमदार गणपत गायकवाडांचा आरोप

19 Nov 2017 03:00 PM

खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मांना खंडणीची रक्कम मिळते का ? असा आरोप कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलाय..
गणपत गायकवाड यांना गँगस्टर सुरेश पुजारीच्या नावानं धमकी देण्यात आलीय. 50 लाखांची खंडणी न दिल्यास आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचा मुलाला मारलं जाईल असा फोन त्यांना आला होता. या सगळ्याची तक्रार पोलीस उपायुक्तांकडे केल्यानंतरही त्याची साधी चौकशीही झाली नाही, यानंतर पुन्हा फोनवर पुजारी गँगकडून ही धमकी देण्यात आली...याबाबत गणपत गायकवाडांनी प्रदीप शर्मांशी वेळोवेळी भेटण्याचा प्रयत्न केला..मात्र ते भेटले नाही, त्यामुळं प्रदीप शर्मांना खंडणीचे अर्धे पैसेतर मिळत नाही ना?, असा खळबळजनक आरोप आमदार गणपत गायकवाडांनी केला आहे...मात्र प्रदीप शर्मांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलंय..

LATEST VIDEOS

LiveTV