कल्याण : महापालिकेबाहेर अपंगांचं धरणं आंदोलन

15 Dec 2017 08:54 AM

वारंवार होत असलेल्या दुर्लक्षामुळे कल्याण-डोंबिवलीतील अपंगांनी आज महापालिकेबाहेर धरणे आंदोलन केलं. एकीकडे अपंगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असताना महापालिका मात्र अपंग दिनाचे कार्यक्रम आयोजित करते, त्यामुळे पहिले आम्हाला आमच्या सुविधा द्या मग बडेजाव करा असं म्हणत संतप्त अपंगांनी भर उन्हात आंदोलन केलं. वारंवार निवेदनं देऊनही गाळे वाटप, दिव्यांग निधीतून पेन्शन, वैद्यकिय खर्च, स्टॉल्स पाडलेल्या अपंगांचं पुनर्वसन यांसारख्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं.

LATEST VIDEOS

LiveTV