कल्याण : केडीएमसीचा भोंगळ कारभार, न्यायासाठी अपंगावर पुरस्कार विकण्याचा निर्णय

01 Dec 2017 09:45 AM

केडीएमसी अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामउळे एका अपंगावर उपासमारीची वेळ आल्याचा प्रकार कल्य़ाणमध्ये समोर आलाय. २०१५ साली कल्याण स्टेशन परिसरातल्या अनधिकृत स्टॉल्सवर केडीएमसीनं कारवाई केली होती, मात्र यावेळी अपंग शंकर साळवे यांना शासनाने दिलेल्या अधिकृत दूधकेंद्रावरही पालिकेनं बुलडोझर फिरवला होता. ही चूक लक्षात आल्यानंतर पालिकेनं साळवे यांचं पुनर्वसन करत स्टॉल देण्याचं आश्वासन दिलं. याला दोन वर्षे उलटली, तरी साळवे मात्र अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेतच आहेत. अनेकदा पालिकेचे उंबरठे झिजवूनही त्यांना न्याय मिळत नसल्यानं अखेर त्यांना मिळालेला राज्य सरकारचा पुरस्कार विकून उपासमारी दूर करण्याचा निर्णय घेतला.

LATEST VIDEOS

LiveTV