कल्याण : रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे तिघांचे प्राण वाचले

23 Dec 2017 11:27 PM

मुंबईजवळच्या कल्याणमध्ये २ वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वे पोलिसांनी तिघांचे प्राण वाचवलेत. १६ डिसेंबरला मुंबई-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस कल्याण स्थानकावरील ४ नंबर प्लॅटफॉर्मवरून सुटली...त्यावेळी चालत्या गाडीत चढताना एक महिला  आणि तीची मुलगी अडखळल्या...यामध्ये मुलीनं कसबस स्वताला वाचवलं मात्र आई एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये अडकली, यावेळी प्रसंगवधान दाखवत रेल्वे पोलिसांनी महिलेला ओढून बाहेर काढलं...तर २१ डिसेंबरला दुसऱ्या घटनेत मुंबई-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस पकडण्याच्या प्रयत्नात एक महिला तिच्या मुलासह रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये अडकली... यावेळी आरपीएफ कॉन्स्टेबल किरणकुमार मीना यांनी गांडी थांबवत महिला आणि मुलाची सुखरूप सुटका केली... या दोन्ही घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाल्यात....

LiveTV