कल्याण : एकाच रात्रीत 4 दुकानं लुटली, प्रकार सीसीटीव्हीत कैद

21 Nov 2017 12:39 PM

कल्याणमध्ये आमदार आप्पा शिंदे यांच्या मेडिकलसह एकाच रात्रीत चार दुकानं फोडली गेली आहेत. महत्वाचं म्हणजे या चारही दुकानाजवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एकच चोर कैद झालाय. कल्याण पूर्वेच्या कोळसेवाडी भागात हा प्रकार घडला.
आमदारांच्या मेडिकलबरोबरच रेखा मेडिकल, ज्युपिटर मेडिकल आणि लासी ट्रेडर्स या दुकानांमध्येही चोरी झाली आहे. त्यामुळं या चोरट्याला पकडण्याचं आव्हान सध्या कोळसेवाडी पोलिसांसमोर आहे.

LATEST VIDEOS

LiveTV