कल्याण : शहरात वृद्धांना लूटणाऱ्या रिक्षाचालकाचा धुमाकूळ

11 Dec 2017 10:54 PM

कल्याणमध्ये वृद्धांना बोलण्यात गुंतवून लुटणाऱ्या रिक्षावाल्याने सध्या चांगलाच धुमाकुळ घातलायं. या रिक्षाचालकानं गजबजलेल्या शिवाजी चौकात दोन वृद्धांना लुटलं असून हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालायं. लुटल्या गेलेल्यांमध्ये कल्याणचे ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर यांचाही समावेश आहे. ते महापालिकेकडून शिवाजी चौकाकडे पायी जात असताना अचानक त्यांना एका रिक्षाचालकाने हात धरुन थांबवले आणि बोलता बोलता मोबाईल घेऊन पोबारा केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालायं. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.

LATEST VIDEOS

LiveTV