कल्याणमध्ये विकासकामांच्या श्रेयवादातून दोन नगरसेविकांमध्ये राडा

17 Oct 2017 11:57 AM

कल्याणमध्ये बॅनर लावण्यावरुन शिवसेनेच्या दोन नगरसेविका चक्क एकमेकिंना भिडल्या आहेत. कल्याण पूर्वमधील शीतल मंढारी आणि माधुरी काळे अशी या नगरसेविकांची नावं आहेत. प्रभाग क्रमांक 98 आणि 99 मध्ये या दोघी शिवसेनेकडून नगरसेविका आहेत. प्रभाग क्रमांक 98 च्या नगरसेविका शितल मंढारी असून याआधी या प्रभागाच्या नगरसेविका माधुरी काळे होत्या. याच परिसरातील एका सोसायटीच्या आवारात विकासकामे केल्याबद्दल नगरसेविका माधुरी काळे यांच्या अभिनंदनचं होर्डिंग लावण्यात आले होते. यावरुन दोघा नगरसेविकांमध्ये वाद झाला आणि नंतर या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं. दोन्ही नगरसेविकांनी एकमेकांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

LATEST VIDEOS

LiveTV